Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ३

सामाजिक...

दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...
२०२५ - २०२६...


"काय माझा गुन्हा...?" भाग ३


"किती नालायक आणि खोटारडी आहे हि मुलगी... स्वतःच्या प्रियकराला दिवसाढवळ्या आपल्या बेडरूम मध्ये बोलावते... म्हणजे किती खालच्या पातळींवर उतरलेली आहे हे स्पष्ट दिसते..." सासुबाई गौरवीला हातवारे करत बोलते...


" माधव तुम्ही आईंंच्या बोलणार विश्वास नका ठेवू... अहो माझा कोणताही प्रियकर नाही...माझा कोणाशीही कसलाही संबंध नाही...अहो मी खरंच सांगते... मी काहीही केलेले नाही... , मला नाही माहित हा कोण आहे...? कुठून आला...? कसा आला...? आणि मुळात तो आपल्या बेडरूम मध्ये नेमका कसा आला...? मला खरंच नाही माहित... प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा..." गौरवीला आपल्या चारित्र्यावर अचानक झालेल्या आरोपांचे ती खंडन करण्याचा प्रयत्न करते...


"तो तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल असं का वाटतं तुला...? सासुबाई जरा जोशातच बोलतात...


" गौरवी तु असं वागशील असं कधीच मला वाटले नाही... मला आई..., ताई सतत सांगत होती... की तुझे बाहेर काहीतरी प्रकरण चालू आहे... तुझे कोणासोबत संबंध आहेत... तरी मी दुर्लक्ष केले... कारण माझा तुझ्यावर विश्वास होता... आणि माझं तुझ्यावर खुप प्रेम सुद्धा होतं..." माधव निराशतेने बोलतो...


" प्रेम होतं म्हणजे..." गौरवी रडकुंडीला येत विचारते... पण माधव  काहीच उत्तर देत नाही...


"अरे बोल ना... आता का असा गप्प आहेस... प्रेम होतं म्हणजे पुढचे पण बोल ना... माझ्या मनात खुप काही वाईट साईट विचार येतायत...माझं मन हि खुप अस्वस्थ होत आहे...बोल ना काहीतरी...असा गप्प नको बसू..." आता मात्र गौरवी खरोखरच रडायला सुरुवात करते...


"तु माझा विश्वासघात केलास गौरवी..." असं म्हणत माधव त्या इसमाच्या दोन तीन मुस्कटात देतो... त्याला तो अक्षरशः लाथेने तुडवतो... तेव्हा माधवची आई त्याला अडवते... आणि म्हणते...


"अरे त्याला कशाला मारतोस...त्यात त्याची काय चुक...सोड त्याला...जाऊ देत त्याला... जर आपलंच नाणं खोटं असेल तर दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग..."


"आई...$$$.... वाट्टेल ते कोणतेही आरोप मी सहन करुन घेणार नाही... " गौरवी चवताळून उठते... आणि सासुबाईनां बोलते...


"आणि तुम्ही माधव... तुम्ही माझ्यावर कोणत्या आधारावर असले घाणेरडे शब्द फेकताय आणि आरोप करताय..." गौरवी आता रागाने बोलते...


" तू जे काही केलेस... आणि जे काही दिसते त्यावरूनच बोलतोय... समजलं ..." माधव रागारागाने बोलतो


"शेवटी तू दाखवूनच दिलेस की कुळच घाणीतलं असेल तर त्या मुलीचे रक्त सुद्धा हे घाणच असणार... त्यामुळे ते आपले रंग दाखवणारच... कळलं का माधवा...." माधवची आई जरा ठसक्यातच 'कुळच घाणीतल...' या शब्दावर जोर देऊन बोलतात...


"अहो... ऐकलात का... सासूबाईंनी माझ्या आईला आणि माझ्या रक्ताला शिव्या दिल्या... माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले..." गौरवी आता हतबल..., निराश... आणि दुःखी होत माधवला बोलते...


"हो...ऐकलं मी... बहिरा नाही मी..." माधव तोंड फिरवून बोलतो...


"आणि तरीही तुम्ही शांतपणे उभे राहून ऐकताय...? गौरवी आश्चर्याने विचारते...


"काय चुकीचे बोलली आई..." माधव अजूनही रागातच बोलतो


"म्हणजे तुम्हाला सुद्धा हे पटतं...? गौरवी अजूनच आश्चर्याने विचारतं...


"न पटायला काय झालं...जे तु केलंस.‌.आणि तु वागलीस पण तशीच...मला फसवलंस... मग तु माझ्याकडून कसली अपेक्षा करतेस..." माधव अजूनही रागातच बोलतो...


"माधव....$$$$..." गौरवी चवताळून बोलते...


"तु एकदा दादाला अरे तुरे करतेस... तर एकदा अहो जावो करतेस... एकदाच काय ते कन्फर्म कर ना तुला त्याला नक्की कशाप्रकारे हाक मारायची आहे ती..." ननंद बाई अजूनच आग लावते...


पण गौरवी आपल्या ननंदेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते... व ती माधवकडे बघते व त्याच्याशी बोलण्याचा व आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करते...


"माधव... अरे तुझा काहीतरी चुकीचा गैरसमज झाला आहे... मी काय बोलते ते एकदा ऐकून घे..." गौरवी आता रडकुंडीला आली होती... आणि त्यातच ती माधवला समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती...


पण तीचं बोलणं माधव पर्यंत पोहोचतच नव्हते असं म्हणा किंवा पोहचूच देत नव्हते...


कारण मध्ये मध्ये सासुबाई आणि ननंद बाई आगीत तेल ओतण्याचे काम चांगल्याप्रकारे करत असल्याने गौरवीचे शब्द माधवच्या कानापर्यंत पोहचून सुद्धा ते त्याचा भावनांपर्यंत पोहचतच नव्हते...


"अरे तीचं काय बोलणं ऐकत बसलास...? इतके दिवस तीचे ऐकतच होतास ना... मग मिळाले ना तुला त्याचे फळ..." सविता देवी आग भडकवू लागली...


"मला तुझ्याशी कोणतेही आणि कसलेही संबंध ठेवायचे नाही...त्यामुळे आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या घरातून..." माधव सुद्धा आता रागाने आणि मोठ्याने ओरडत बोलतो...


"अरे नुसता ठोंब्यासारखा उभा राहून बोलू नकोस...त्या सटवेचा हात धर आणि फेक ती घाण घराबाहेर..." सासुबाई तावातावाने माधवला बोलतात...


आईचे शब्द ऐकताच माधव तावातावाने गौरवीचा हात धरण्यासाठी जातो... तेव्हा गौरवी स्वतःच्या बचावासाठी बेडरूममध्ये पळण्याचा प्रयत्न करते... परंतु गौरवीची सासुबाई आणि नणंद तिथेच उभे असल्यामुळे तीला लगेच पकडतात... आणि तीला माधव कडे ढकलून देत म्हणतात...
"चालती हो आमच्या घरातून...."


क्रमशः...

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all